Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गिरगावनंतर आज प्रभादेवी येथे आदित्य ठाकरेंची जाहीर सभा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aditya Thackeray Meeting at Prabhadevi

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत. मात्र, या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा मैदानात उतरले आहेत. गिरगावनंतर आज प्रभादेवी येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. (latest political news)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात आदित्य ठाकरेंची सभा

आज सदा सरवणकर यांच्या शाखेच्या समोर आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरु झालीय. यापूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात देखील आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा (Aditya Thackeray Meeting) झाली होती. त्यानंतर विभाग क्रमांक 10 च्या वतीने प्रभादेवी सामना प्रेसजवळ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणूकीची तयारी

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election) प्रचंड तयारी केली जातेय. ठाकरे गटाने कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईचा किल्ला राखायचाच, असा निर्धार केल्याचं दिसतंय.

त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाकडून (Aditya Thackeray) यापूर्वी शाखानिहाय बैठका, विधानसभानिहाय बैठका, लोकसभेचा आढावा, तसेच इतर कार्यक्रम देखील घेण्यात आले होते. त्यानंतर आता ही सभा होतेय. या सभेला मतदार कसा प्रतिसाद देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पहिली सभा

आदित्य ठाकरे 6 जानेवारी रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात पहिली सभा पार पडली होती. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेचं गिरगाव येथे विभाग क्रमांक 12 ने आयोजन केलं होतं. या सभेतून आदित्य ठाकरे यांनी खासदार अरविंद सावंत यांनी प्रचार केला होता.

ठाकरे गटाकडून (Lok Sabha Election) दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT