Aditya Thackeray on Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray on Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा अपेक्षित नाही, शिंदेच्या त्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे संतापले

मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा अपेक्षित नाही, शिंदेच्या त्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे संतापले

Satish Kengar

Aditya Thackeray on Eknath Shinde: ''मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे, पाऊस आला त्याचं स्वागत करतो. पण मुंबईत पाणी तुंबलं यांची तक्रार काय करता. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा आम्हाला अपेक्षित नाही'', असं ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काल मुंबईमध्ये कधी पाणी तुंबत नाही, ''तिथे पाणी तुंबलं. यावेळी मुख्यमंत्री कुठे होते, काय माहित. त्यांचं एक वक्तव्य वाचाल, पाऊस आल्याचे स्वागत करा तक्रार काय करता?''

ते म्हणाले, हे निर्लज्ज सरकार आहे. ''मी आतापर्यंत इतका निर्लज्जपणा कधी पाहिला नाही. दोन गोष्टींवर आपल लक्ष वेधलं आहे. रस्ते घोटाळा आणि नालेसफाई.'' (Latest Marathi News)

आदित्य ठाकरे म्हणाले की, ''दहीहंडीला हे खेळाचे दर्जा देणार होते. अजूनही दिलं नसून एक सुद्धा आश्वासन पूर्ण नाही.'' रस्ते कामात सहा हजार कोटीचा घोटाळा या सरकारने केल्याचा आरोपही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''31 मे पर्यंत आपली कामे पूर्ण होतात आणि तात्पुरते काम आपण साधार्णपणे बंद करतो. नागरिकांना त्रास होत आहे विनाकारण रस्ते खोदून ठेवले आहेत, अशी लोकांची तक्रार आहे. जेवढ्या मिटिंग महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी झाल्या तेवढी बैठक ही यासाठी झाली असती, तर असं वक्तव्य करण्याची वेळ आली नसती.''

ते म्हणाले, रात्रीची पाहणी करण्यासाठी आपण फिरलो होतो. 'उद्धव ठाकरे स्वतः नालेसफाईसाठी प्रत्येक विभागात जात होते. किती पंप चालू आहेत, किती नाहीत, कुठे पाणी सचेल, अशी सर्व आपण पाहणी करायचो. पंप वाढवले असे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले, पण ते कुठेही दिसलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

SCROLL FOR NEXT