Mumbai North West Lok Sabha Election Result: Saamtv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: रविंद्र वायकरांचा विजय वादात! मतमोजणी प्रक्रियेत काय घोळ झाला? आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी सगळं सांगितलं

Mumbai North West Lok Sabha Election Result: मतमोजणीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात युवा नेते आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी या मतमोजणी प्रक्रियेत फेरफार झाल्याचे आरोप केले.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १७ जून २०२४

मुंबई उत्तर पश्चिम मध्य मुंबई लोकसभेच्या निकालावरुन सध्या शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरू आहे.ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यामध्ये ही लढत झाली ज्यामध्ये अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. मात्र या मतमोजणीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात युवा नेते आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी या मतमोजणी प्रक्रियेत फेरफार झाल्याचे आरोप केले.

अनिल परब काय म्हणाले?

"4 जूनला जो निकाल लागला. ज्यामध्ये आमचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. मतमोजणीत निवडणुक प्रक्रियेला हरताळ फसण्यात आले. १९ व्या फेरीनंतर निकालातली पारदर्शकता कमी झाली. एक फेरी पूर्ण झाली की RO (रिटर्निंग ऑफीसर) उमेदवाराला मिळालेल्या मतांची माहिती देतो. १९ व्या फेरीपर्यंत सगळी माहिती सांगितली जाती होती. मात्र त्यानंतर कोणतीच माहिती मिळाली नाही," असे अनिल परब यांनी सांगितले.

"मतमोजणी कक्षात १४ टेबल असतात. तिथेच RO चे टेबल असते. तिथे मतदानाची आकडेवारी जाते. यावेळेला RO चा टेबल आणि आमच्यात खूप अंतर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला RO पूढे काय पाठवतो याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती, असे अनिल परब म्हणाले. तसेच आम्ही केलेली बेरीज आणि त्यांची बेरीज यामध्ये 650 मतांचा फरक आलाय," असा दावाही त्यांनी केला.

आम्ही न्यायालयात जाणार!

"निकाल जाहीर करायच्या आधी अधिकारी उमेदवारांना विचारायचं असतं की कोणाला काही आक्षेप नाही ना? मात्र असं काही विचारलेलं नाही. आरओ अधिकाऱ्याला कोणाचा फोन येत होता? वॉशरूममध्ये जाऊन ते बोलत होते. आमची निवडणूक आयोगाकडे मागणी आहे, आम्ही न्यायालयीन लढाई लढणार. आमचा उमेदवार विजयी घोषित करावा अशी आमची मागणी आहे," असेही अनिल परब यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT