'मविआ' सरकारमधील नेत्यांवरील कारवाया राजकीय सूडबुध्दीनेच - नवाब मलिक SaamTV
मुंबई/पुणे

'मविआ' सरकारमधील नेत्यांवरील कारवाया राजकीय सूडबुध्दीनेच - नवाब मलिक

सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात ज्या काही ईडीच्याED धाडी मविआMVA सरकारमधील नेत्यांवरती पडत आहेत हे सर्व जे घडतंय ते राजकीय सूडबुध्दीने घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक NCP LEader Navab Malik यांनी केला आहे. Actions against leaders in the MVA government with political revenge

हे देखील पहा-

भाजपनेते नारायण राणेNarayan Rane यांना महाविकास आघाडी सरकारने केलेली अटक आणि त्यांना अटक करा असा अधिकाऱ्यांवरती दबाव अनिल परब Anil Parab यांनी टाकला होता हा भाजपच्याBJP डोक्यातील राग आणि त्यामुळेच राणेंच्या अटकेचे सुत्रधारच भाजपने अनिल परब यांना मानलं असल्यामुळे त्यांच्यामागे ईडीचा फेरा लावला आहे असं शिवसेनेकडून बोललं जात आहे. अनिल परबांसोबत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थांचीही ईडी कडून चौकशी सुरु आहे त्यामुळे हे सर्व राजकीय सुडापोटी चालू असल्याची टीका विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे त्यावरती भाष्य करताना नवाब मलिक यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

ईडीमार्फत नेत्यांना नोटीस देणे आपल्या अधिकारातील संस्थांचा गैरवापर करणे ही भाजपची सवय आहे तसेच काही ठिकाणी छापेमारी होतेय. त्यांना अधिकार असतील तर त्यांनी करावी परंतु ज्यापध्दतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत आणि कारवाई व्हायच्या आधी कोणावरती कारवाई होणार हे सांगितलं जात आहे याचा अर्थ या सर्व कारवाया ठरवून राजकीय सुडापोटी कारवाया केल्या जात असल्याचही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने Supreme Court आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करायला ईडीला सांगितले होते अशी आठवण ही नवाब मलिकांनी यावेळी करुन दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT