Ramdas Athavale Saam TV
मुंबई/पुणे

राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत सोंगे करु नयेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी - रामदास आठवले

मी शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. शरद पवार जातीवादी नाहीत. तसंच बाबसाहेब आंबेडकर यांचा कलम 370ला विरोध होता हे खरं आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे इशारे केवळ इशारेच असतात, राज यांनी भोंगे उतरवण्याची केलेली मागणी अयोग्य असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे. ते म्हणाले, 'राज ठाकरे यांचे इशारे केवळ इशारेच असतात. राज ठाकरे यांची भोंगे उतरवा ही मागणीच अयोग्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशी कधी मागणी केली नव्हती. राज ठाकरेंनी भोंग्यांबाबत सोंगे करु नयेत. जर ते धमकी देत असतील तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, तसंच त्यानी भोंगे काढण्याचा प्रयत्न केला तरी आरपीआय आपलं शक्ती प्रदर्शन करेल असा इशाराच आठवलेंनी दिला आहे.

तसंच त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला बीआयटी चाळीचे स्मारक करण्यासाठीची आठवणही करुन दिली ते म्हणाले, बीआयटी चाळीत दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री आले होते आणि त्यानी याठिकाणी स्मारक करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप केलेलं नाही . आमची मागणी आहे या चाळीचा पुनर्विकास करावा यासोबतच भव्य दिव्य स्मारक देखील याठिकाणी व्हावं अशी आमची मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार असल्याचही आठवले यावेळी म्हणाले.

शिवाय संजय राऊत (Sanjay Raut) यांनी न्यायालयाबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य नाही. किरीट सोमय्या यांच्याबाबत ते जर बोलतं असतील तर जामीनासाठी अर्ज करणे हा त्यांचा अधिकर असल्याचंही ते म्हणाले.

अखंड भारतासाठी समर्थन -

पूर्वी अखंड भारत होता. पूर्वी पकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ ही राष्ट्र अपल्या देशात होती आता जर या सर्वांना घेऊन नरेंद्र मोदी एखादी फेडरेशन काढण्याचा विचार करतं असतील तर मग हा निर्णय होऊ शकेल. आणि हे फेडरेशन म्हणजेच अखंड भारत ही संकल्पना आहे. फक्त आपले संबंध पाकिस्तान सोबत चांगले नाहीत जर त्यांनी दहशत वाद सोडला तर नक्कीच एक अखंड भारत होईल

शरद पवार जातीवादी नाहीत -

मी शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. शरद पवार जातीवादी नाहीत. तसंच बाबसाहेब आंबेडकर यांचा कलम 370ला विरोध होता हे खरं आहे. बाबासाहेबांचं म्हणण होतं की विशेष राज्याचा दर्ज काश्मीरला नको कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असंही त्यांनी सांगितलं. तर राज ठाकरे भाजपची बी टीम आहे असं संजय राउत म्हणतात परंतु आरपीआय भाजपची ' ए' टीम आहे. त्यामुळें राज ठाकरे बी टीम असण्याचा काहीच विषय येतं नाही. त्यामुळें संजय राऊत यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT