Mumbai Crime विकास मिरगणे
मुंबई/पुणे

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बनावट विदेशी स्कॉचचा साठा जप्त

सुमारे १४ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा बनावट विदेशी स्कॉचचा साठा व इतर साहित्य जप्त केले आहे.तसेच अल्पवयीन तरुणासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

विकास मिरगणे

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने  एका टॅक्सीवर तसेच कोपरखैरणेतील एका घरावर छापा (Raid) मारुन सुमारे १४ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा बनावट विदेशी स्कॉचचा साठा व इतर साहित्य जप्त केले आहे. तसेच अल्पवयीन तरुणासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारु भरुन त्यांची बाजारात विक्री करत असल्याचे आढळुन आले आहे.   

काही व्यक्ती बनावट विदेशी मद्याची वाहतुक करुन घेऊन जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार  राज्य उत्पादन शुल्क ई विभागाचे निरीक्षक एस.एस.गोगावले, डी विभागाचे निरीक्षक आर.के. शिरसाठ, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक संजय पुरळकर, विजय धुमाळ, आदींच्या पथकाने  ठाणे-बेलापुर मार्गावर तुर्भे रेल्वे स्टेशन समोर विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या वाहनावर पाळत ठेवली होती. कल्याणच्या दिशेने जाणारी संशयीत ईको कार निदर्शनास आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरची टॅक्सी अडवून त्याची तपासणी केली. 

हे देखील पहा -

यावेळी सदर टॅक्सीमध्ये बनावट विदेशी स्कॉचने भरलेल्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सुनिल शांतीभाई वाघेला (३५), उमेश जितेंद्र दुबे (३३) व त्यांचा अल्पवयीन साथिदार या तिघांना बनावट स्कॉचच्या बाटल्या व कारसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यानंतर त्यांनी कोपरखैरणे सेक्टर-१९ भाड्याने घेतलेल्या घरात मद्याचा साठा ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने सदर घरावर छापा टाकुन त्याची तपासणी केली. यावेळी सदर घरामध्ये देखील बनावट स्कॉचने भरलेल्या सिलबंद बाटल्या तसेच रिकाम्या स्कॉच च्या बाटल्या ८०० विविध ब्रँडचे लेबल, २ ड्रायर व २ टोचे असे साहित्य आढळुन आले.

या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तुर्भे गावातील बजरंग बेकरी समोर उभी असलेली ऍक्टीवा स्कुटी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता, सदर स्कुटीमध्ये देखील विदेशी मद्याच्या बाटल्या आढळुन आल्या. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १४ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मद्याचा साठा व इतर साहित्य जफ्त केले आहे. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले तिघेही कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील घरामध्ये बनावट दारु तयार करुन सदरची दारु रिकाम्या बाटल्यामध्ये भरुन त्याची बाजारात विक्री करत असल्याचे आदळून आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत'; भाऊबीजेला कोणता शो हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Crime: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याची हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून संपवलं; पिंपरी-चिंचवड हादरले

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

SCROLL FOR NEXT