Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बनावट नोटा वटवण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक, मालवणी पोलिसांची कारवाई

भारतीय चलनाच्या बनावट नोटा वटविण्यास आलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai News Today: भारतीय चलनाच्या बनावट नोटा वटविण्यास आलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कडून पोलिसांनी पाचशे रुपयांच्या भारतीय चलनातील बनावट नोटांसह एकूण सात लाखाहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. उमेश कुमार, (वय 32 ) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड (Malad) पश्चिमेकडील मालवणी गेट नंबर एक परिसरात एक व्यक्ती भारतीय चलनातील बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सपोनी हसन मुलानी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

पोलीस (Police) निरीक्षक शेळके आणि त्यांच्या पथकाने खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणावर सापळा लावला असताना त्या ठिकाणी गुप्त बातमीदाराने वर्णन केल्या प्रमाणे एक व्यक्ती आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तपास पथकाने घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.

त्याची अंग झडती केली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या एकूण आठ नोटा आणि मोबाईल फोनअसा मालमत्ता आढळून आला. म्हणून त्याच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात कलम 489 (ब), 489(क) भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Mumbai News)

चौकशी दरम्यान त्यांच्या घराची घरझडती घेऊन लॅपटॉप, आयपॅड, 2 पेनड्राईव्ह, 4 मोबाईल, कोरे बॉन्ड पेपर रिम, मायक्रो मेमरी कार्ड आणि कलर प्रिंटर असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांची किंमत तब्बल 7 लाख 27 हजार रूपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT