अभिजीत देशमुख
Kalyan News Today: अवैध वाहतुकीचा संशयाने कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गोविंदवाडी परिसरात एक गाडी अडवली मात्र गाडी चालक तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मारण्याच्या उद्देशाने भरधाव वेगाने गाडी पोलीस कर्मचाऱ्यांचा अंगावर चढवण्याचा प्रयत्न केला व तेथून पसार झाला होता. दोन वर्षापूर्वी ही घटना घडली होती. या गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलीस त्याचा शोध घेत होते. (Latest Marathi News)
सूरज उर्फ बारक्या असे या आरोपीचे नाव असून अवैध वाहतुकीच्या गुन्ह्यात हा तरुण वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती समोर आली. तब्बल दोन वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांना गोविंदवाडी परिसरात हा तरुण येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत सूरजला बेड्या ठोकल्या.
सुमारे दोन वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेकडे गोविंदवाडी एपीएमसी परिसरात कल्याण बाजारपेठ पोलिसांची (Police) चेकिंग सुरू होती. या दरम्यान एका गाडीवर त्यांना अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय आला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला .मात्र गाडी चालक तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याचा उद्देशाने गाडी भरधाव वेगाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. (Kalyan Crime)
सुदैवाने पोलीस कर्मचारी प्रसंगावधान राखत बाजूला सरकले. त्यामुळे मोठा अनर्थ ठरला मात्र याच दरम्यान हा गाडी चालक पसर झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत या गाडी चालक चालकाचा शोध सुरू केला. त्याची ओळख पटवली असता हा तरुण अवैध वाहतुकीच्या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती समोर आली.
तब्बल दोन वर्ष हा तरुण पोलिसांना चकवा देत होता. अखेर हा तरुण कल्याण गोविंदवाडी परिसरातील एका इमारती जवळ येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अरून घोलप यांना मिळाली. या माहितीच्या आधारे घोलप यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला.सुरज खैरीराम कायरिया उर्फ बारक्या हा या परिसरात येताच बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर झडप टाकत त्याला बेड्या ठोकल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.