Accused in Umesh Kolhe murder case Saam TV
मुंबई/पुणे

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला तुरुंगात मारहाण; नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद तुरुंगापर्यंत

उमेश कोल्हे यांची हत्या करणारा आरोपी शाहरूख पठाण याला पाच कैद्यांनी आर्थररोड तुरुंगात मारहाण केली आहे.

सुरज सावंत

मुंबई : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वक्तव्याला समर्थन करणारे उमेश कोल्हे यांची हत्या करणारा आरोपी शाहरूख पठाण याला पाच कैद्यांनी आर्थररोड तुरुंगात (Arthur Road Jail) मारहाण केली आहे. त्यामुळे नुपूर शर्मा वक्तव्याचा वाद आता देशातील अतिसंवेदनशील आर्थर रोड तुरुंगापर्यंत पोहोचला आहे. शाहरूख पठाण (ShahRukh Pathan) व इतर कैदी आर्थर रोड तुरुंगात बोलत होते.

त्यावेळी कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली. त्याबाबत चर्चा सुरू असताना पठाणने नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याप्रकरणी उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या केल्याप्रकरणी अटक झाल्याचे सांगितलं असता आरोपी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव यांनी शाहरूखवर हल्ला केला.

पाहा व्हिडीओ -

मुंबई मध्यवर्ती कारागृह(आर्थर रोड) येथील सर्कल क्रमांक ११ मधील बराक क्रमांक २ मध्ये ही मारहाण झाली असून याबाबतची माहिती तुरुंग सुरक्षा रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पठाणला इतर आरोपींपासून वेगळे केले. पठाणच्या हाताला व गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारागृह रुग्णालयातच उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन तुरुंग प्रशासनाने याप्रकरणी पठाणवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुरुंग अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३ अंतर्गत तुरुंगाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. २३ जुलैला ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी रात्री पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT