Swadiichacha Sane Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: रहस्यमयरित्या गायब झालेल्या सदिच्छाबाबत धक्कादायक माहिती उघड, तब्बल 14 महिन्यानंतर आरोपींनी तोंड उघडलं

सदिच्छा एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात जेजे मेडिकल कॉलेजला शिकत होती.

सूरज सावंत

मुंबई : मुंबईतून रहस्यमयरित्या गायब झालेल्या सदिच्छा सानेबाबत धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मिट्टू सिंहने मोठा खुलासा केला आहे. सदिच्छाची हत्या करुन तिला समुद्रात फेकल्याची कबुली मिट्टू सिंहने जबाबात दिली आहे.

डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाची MBBSचं शिक्षण घेणारी 22 वर्षीय सदिच्छा साने परीक्षेसाठी पालघरहून मुंबईत आली होती. स्वादिच्चा 14 महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबईत आली आणि तेव्हापासून ती गायब होती. अखेर 14 महिन्यानंतर या गुन्ह्याचा छडा लागला आहे. (Latest Marathi News)

बँड स्टँडला सदिच्छाने मिट्टू सिंहसोबत शेवटचा सेल्फी काढला होता. मुंबई गुन्हे शाखाचा कक्ष 9च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती. मात्र सदिच्छा गेली कुठे हे अजून तपासात निष्पन्न झाले नव्हते. मात्र आता आरोपींनी पोलिसांसमोर सदिच्छाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

सदिच्छावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली का? याचा तपास पोलीस करत आहेत.पोलिसांनी दोन आरोपींना अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली होती, पण आता त्यात खुनाचे कलम जोडले जाणार आहे.

सदिच्छा एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात जेजे मेडिकल कॉलेजला शिकत होती. 29 नोव्हेंबरला बोईसरहून ती परीक्षेला जाते असे सांगून घरातून निघाली; मात्र कॉलेजला पोहोचलीच नाही. रात्री ती वांद्रे येथे बँडस्टॅंडला गेली होती, तिचे तिथे मोबाईलचे शेवटचे लोकेशन सापडले होते. तिथे ती जीवरक्षक मिट्टू सिंगला भेटली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT