Accident News Saam tv
मुंबई/पुणे

Accident News: बेदरकारपणाचा बळी! भरधाव डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नवले ब्रीजजवळील दुर्देवी घटना

काही दिवसांपासून पुण्यामधील नवले ब्रीजवर अपघातांची मालिका सुरूच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune: पुण्य़ातील नवले ब्रीजवर गेल्या काही दिवसांपासून अपघात होताना दिसत आहेत. आज सकाळीच डंपरच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. भरधाव व बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याने निखिल गोविंद राठोड या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील नवले ब्रीजवर अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच नवले पुलावर भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले होते.

आता पुन्हा एका डंपरने बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकीस्वाराला धडक दिल्याने निखिल गोविंद राठोड या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. नवले ब्रीजजवळील भूमकर चौकात ही घटना घडली आहे.

या भीषण अपघातानंतर सिंहगड पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातानंतर नवले ब्रीजवरील वारंवार अपघात होण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Pune)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

Diwali 2025: 800 वर्षांनंतर दिवाळीला बनणार 5 राजयोग; 'या' 3 राशी रातोरात होणार श्रीमंत

SCROLL FOR NEXT