Mumbai-Pune Expressway Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ९ वाहनं एकमेकांना धडकली; अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

खोपोलीजवळील बोरघाटात आज झालेल्या अपघातामध्ये तब्बल ९ वाहने एकमेकांना धडकली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम -

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील (Mumbai-Pune Expressway) अपघातांची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये. मागील अनेक दिवसांपासून या एक्सप्रेस वेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. अशातच पुन्हा आणखी एक भयंकर अपघात एक्स्प्रेस वेवर झाला आहे.

खोपोलीजवळील (Khopoli) बोरघाटात आज झालेल्या अपघातामध्ये तब्बल ९ वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या वाहनामंध्ये एक ट्रक, एसटी बस (ST) आणि ७ कारचा समावेश असून या भयानक अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळील बोरघाटात मुंबई लेनवरती ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि या ट्रकने एसटी बससह इतर ७ कारना धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT