Kalyan Dombivli, kalyan dombivli municipal corporation
Kalyan Dombivli, kalyan dombivli municipal corporation Saam Tv
मुंबई/पुणे

ACB Raids On KDMC: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर ACBचा छापा, ३८ वा लाचखोर अधिकारी जाळ्यात

साम न्यूज नेटवर्क

- अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे याला खाजगी सुरक्षा रक्षकाकडून एक हजार रुपये घेताना ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. पाेलिसांनी बुळे याला अटक केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (kalyan dombivli municipal corporation) स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३८ महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

कंत्राटी सुरक्षा रक्षकाकडे भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयांची मागणी केली होती. यामधील एक हजार रुपये घेताना त्याला अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे आणखी काही खाजगी सुरक्षारक्षकाकडून बुळे दर महिन्याचे पाचशे रुपये घेत असल्याची माहिती या प्रकरणामुळे समाेर आली आहे.

ठाणे एसीबी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता भ्रष्टाचाराची कीड ही सुरक्षा विभागापर्यंत पोहोचल्याने लाचखोर कर्मचाऱ्यांची महापालिका हा शिका पुसून काढण्याचा आव्हान आता महापालिका आयुक्तां समोर आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३८ महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरली आहे. यापुर्वी लिपिक, प्रभाग क्षेत्र अधिकारी, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते.

भ्रष्टाचाराची ही कीड आता सुरक्षा विभागापर्यंत देखील पोहोचली आहे. आज ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक सुरक्षा रक्षक भरत बुळे याला एक हजाराची लाच स्वीकारताना अटक केली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून खाजगी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेकडील होम बाबा टेकडी येथे कार्यरत असलेल्या एका खाजगी सुरक्षारक्षकाकडून भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयांची मागणी केली होती. पैशांसाठी बुळे हा तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीनुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सापळा रचला. भरत बुळे याला दाेन हजार पैकी एक हजार रुपयाची रक्कम घेताना पकडले. या प्रकरणी एसीबीकडून बुळे याची चौकशी सूरू असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT