धक्कादायक! वर्दीची शपथ घालून पुण्यातील तरुणीवर बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! वर्दीची शपथ घालून पुण्यातील तरुणीवर बलात्कार

भारतीय सैन्य दलाच्या वर्दीचा (Indian army uniform) गैरवापर करून, एका तरुणाने पुण्यामधील तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : भारतीय सैन्य दलाच्या वर्दीचा (Indian army uniform) गैरवापर करून, एका तरुणाने पुण्यामधील तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने आपण लष्करात असल्याचे सांगून पीडितेला लग्नाचे आमिष (marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपीने आपला फोन बंद ठेवून पीडितेशी संपर्क तोडला. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत. प्रशांत भाऊराव पाटील असे अटक केलेल्या ३१ वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो बेळगाव जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यातील कुंपटगिरी येथील रहिवासी आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आरोपीला बेड्या ठोकले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने शादी डॉट कॉम या वेबसाईटद्वारे पुण्यात तरुणीशी संपर्क साधला होता.

हे देखील पहा-

यानंतर त्याने पीडितेशी ओळख वाढवून, तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. तसेच आपण सैन्य दलात नोकरीला असून सच्चा देशभक्त असल्याचे देखील भासवले होते. यानंतर आरोपीने पीडितेला पुण्यातील दगडुशेठ मंदिरात भेटायला देखील बोलावले होते. येथून आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू असेही आरोपीने पीडितेला सांगितले आणि यानंतर अंगावरील कपडे बदलण्याचा बाहणा करून आरोपी पीडितेला कारमधून नवले ब्रिज परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला होता.

याठिकाणी आरोपीने आम्ही देशासाठी दिवसरात्र दहशतवाद्याशी लढतो, अशा भंपक गप्पा मारत पीडितेला भावनिक करुन, तिच्यावर बलात्कार केला आहे. तसेच पीडितेने आरडा- ओरडा करून नये म्हणून तिला सैन्य दलाच्या वर्दीची शपथ घातली होती. शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यावर, आरोपीने कर्तव्यावर जाण्याचा बहाणा केला आणि पीडितेला शनिवारवाडा परिसरात सोडून देत पळ काढला आहे.

यानंतर पीडितेने आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पीडितेला ब्लॉक केल्याचे लक्षात आले. यामुळे पीडित तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास काढत आरोपीला अटक करण्यात आली आहे. सैन्य दलात भरती झाल्यानंतर आरोपी २०१८ पासून कर्तव्यावर रुजू झाला नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

तसेच आरोपीने या अगोदर नगर, पुणे आणि लातूर परिसरामध्ये फसवणुकीचे ५ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोपाला कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

Arvind Srinivas: फक्त ३१व्या वर्षी तब्बल २१,१९० कोटींचा मालक, कोण आहेत अरविंद श्रिनिवास?

SCROLL FOR NEXT