Abhishek Ghosalkar  Saam Tv
मुंबई/पुणे

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसवर गुन्हा दाखल; 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Abhishek Ghosalkar Case Update : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. तर रोहित शाहू आणि मेहुल पारेख या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतलं.

प्रविण वाकचौरे

सूरज सावंत

Mumbai News :

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.  फेसबुक लाईव्ह सुरु असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यानेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. रोहित शाहू आणि मेहुल पारेख या दोघांना पोलिसांना ताब्यात घेतलं. रोहित शाहू याला चौकशी करुन पोलिसांना सोडलं आहे. तर मेहुल पारेखची पोलीस अद्यापही चौकशी करत आहेत. (Latest Marathi News)

मॉरिस नोरोन्हावर गुन्हा दाखल

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या MHB पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3 आणि 25 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) (ए), आणि 135 नुसार गुन्हा दाखल केला.

अभिषेक घोसाळकर यांना चार गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उजव्या मांडीला दोन गोळ्या, पोटात एक आणि छातीच्या डाव्या बाजूला एक गोळी लागल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे. नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे.

रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चर्चा केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT