Narayan Rane and Aaditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

आदित्य ठाकरेंनी दिले नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, 'काही लोकांवर...'

नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Aaditya Thackeray News : शिंदे सरकार सत्तेवर विराजमान होऊन तीन महिने झाले तरी शिवसेनेकडून शिंदे गटावर टीका सुरुच आहे. राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिवसेनेकडून शिंदे गटाला 'गद्दार' म्हणून संबोधले जात आहे. गद्दार शब्दावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे म्हणून ते सारखं गद्दार गद्दार म्हणत आहेत, अशा शब्दात राणे यांनी टीका केली. नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. कोकण दौऱ्यावर शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच नारायण राणे यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे गट-भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यावर विराजमान झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आज नारायण राणे यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधता दिले. 'काही लोकांवर बोलायची पात्रता नाही', अशा एका वाक्यात आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले.

'बंडखोर आमदारांच्या रक्तात शिवसेना असती तर, आसाममध्ये महापूर आला होता त्यावेळी त्यांनी तिथं मदत केली असती. मला दुःख जास्त याच वाटतंय की, बाळासाहेबांचे विचार म्हणणारे जेव्हा उद्धव साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा नाचत होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता प्रकल्प काय आहे ? हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे तात्पुरते मुख्यमंत्री म्हणतोय कारण हे सरकार कोसळणार आहे. प्रकल्प कुठे गेला याचं काही नाही, पण उद्योग मंत्र्यांना माहितही नाही की प्रकल्प गेला कसा ? या प्रकल्पामुळे तरुणांना नोकरी मिळाल्या असत्या.

'मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेलेला आहात. दिल्लीसमोर जाऊन झुकून आलेला आहात. महाराष्ट्रात एकदा दिल्लीला जा. नवरात्रोत्सव येतोय, त्यांना फिरून रेकॉर्ड करायचा आहे. दहीहंडीची अनेक मंडळ मला येऊन भेटताहेत, म्हणत आहेत की खेळाचा दर्जा केव्हा मिळेल ? त्यामुळे गोविंद्याला अजूनही विमा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांकडून नुसत्या घोषण्या केल्या जात आहेत', असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले होते नारायण राणे ?

नारायण म्हणाले होते की, 'आदित्य ठाकरे यांना दुसरं काही येत नाही. त्यांना काही माहित नसते. ते बालिश आहे. मला त्यांच्याबद्दल काही प्रश्न विचारू नका. मागच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले. पण उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. गद्दारी करणे हे त्यांच्या रक्तात आहे, त्यामुळे ते सारखे गद्दार गद्दार म्हणत आहेत.एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांना साथ दिली म्हणून आज शिवसेना उभी राहिली. ते लोणी आज आदित्य ठाकरे खात आहेत'.

'आम्हाला बोलायला लावू नका. मातोश्रीतील आतल्या आणि बाहेरच्या नको त्या गोष्टी सर्व सांगू. त्यामुळे आदित्य ठाकरे गप्प बसा. तु्म्ही शिवसैनिकांना काय दिलं ? आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडतो ? तुम्ही विरोधी पक्षात आहे. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर यायला हवं. आदित्य ठाकरे यांच्याबाबत मला प्रश्न विचारू नका, तो वेड्या सारखा बडबड करत आहे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे पिंजऱ्यात बसला होता', असेही नारायण म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT