Party workers clash after Aaditya Thackeray’s meeting in Pune, exposing internal conflicts. saam tv
मुंबई/पुणे

ठाकरेंची पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की; पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Aaditya Thackeray Pune Meeting Worker Clash Details: पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या बैठकीनंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली. अंतर्गत वादामुळे कार्यकर्त्यांचा संताप उफाळला असून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

Akshay Badve

पुणे येथे युवसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ही बैठक संपताच पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला. आदित्य ठाकरे यांना भेटू न दिल्याने पदाधिकारी नाराज होता, तसेच पुणे महापालिकेच्या वेळी तिकीट नाकारल्यामुळे आणि पक्षातील अंतर्गत वाद याबाबत पदाधिकाऱ्याला आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करायची होती. मात्र, पक्षातील काही लोकांनी आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचू न दिल्यामुळे हा कार्यकर्ता चांगलाचा संतापला आणि मोठा गोंधळ घातला. दरम्यान माध्यमांचे कॅमेरे दिसताच इतर कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेत त्याची समजूत काढली. या प्रकारामुळे पुणे शहरातील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.

ही बैठक संपल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, आज तीन लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा अनुसार बैठक आयोजित केली होती. यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले, आपण अफवांवर विश्वास ठेवू नये, आम्ही आणि उद्धव साहेब ज्याच्यावर विश्वास ठेवतो ते आमच्या सोबत असतात असा विश्वास व्यक्त करत मातोश्री येथे रविवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत काहीजण ऑनलाइन उपस्थित होते तर काही जण ऑफलाईन उपस्थित होते. सगळे नेते आमच्या सोबत आहेत, आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे असे ते आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. जे लढायलाच तयार नाहीत त्यांचा सोबत असून काय फायदा आणि त्यांची आम्ही हकालपट्टी केलीय. कालच्या बैठकीत सगळे नेते होते. लोकांचा सरकारप्रति रोष खूप वाढला आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी सगळेच हैराण आहेत. त्यासाठी शिवसेना लढत राहील. ऑपरेशन टायगर, लोटस, लेपर्ड.. जे काही त्याने काही होणार नाही, असे म्हणत त्यांनी या सर्व अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत दमदार पावसाची हजेरी...

IND A vs SL A: सुपर ओव्हरनंतर जोरदार वाद; श्रीलंकेच्या खेळांडूंचा आक्रस्ताळेपणा,वैभव सूर्यवंशीला धक्काबुक्की

भाजप मंत्र्याच्या पुतण्याचा चिनी मांजामुळे गळा कापला; रुग्णालयात साडेतीन तास चाललं ऑपरेशन, प्रकृती नाजूक

Nashik Tourism : पावसाळ्यात पार्टनरसोबत 'हे' हिल स्टेशन फिरा, सुंदर निसर्गाच्या प्रेमातच पडाल

Health Care: आठवड्यातून एकदा व्हिटॅमिन ई आणि खोबरेल तेल लावा; त्वचा आणि केसांसाठी ठरेल वरदान

SCROLL FOR NEXT