Shreya Maskar
लहान मुलांमध्ये मधुमेहाचा धोका आजकाल प्रचंड वाढताना दिसत आहे.'टाइप १' आणि 'टाइप २' या दोन्ही प्रकारच्या मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक दराने वाढ होत आहे.
बालपणातील वाढता लठ्ठपणा, बैठी जीवनशैली आणि प्रक्रिया केलेले अन्न , साखरेचे अधिक प्रमाण असलेला आहार ही प्रामुख्याने कारणे आहेत.
सतत द्रवपदार्थ मागणे किंवा भरपूर पाणी पिऊनही डिहायड्रेट झाल्याची चिन्हे दिसू लागतात. मुलं दिवस-रात्र अधिक प्रमाणात द्रवपदार्थांची मागणी करतात.
नेहमीपेक्षा अशा वेळी जास्त वेळा लघवीला जाण्याची गरज भासते. शरीर लघवीद्वारे रक्तातील अतिरिक्त साखर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे, मुलांना वारंवार शौचालयात जाण्याची गरज भासते.
सामान्य किंवा त्याहून अधिक प्रमाणात अन्न खाऊनही वजन झपाट्याने कमी होते. त्यांचे शरीर ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करू शकत नसल्यामुळे, ते त्याऐवजी चरबी आणि स्नायू जाळायला सुरुवात करतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील पेशी इंधन म्हणून ग्लुकोजचा वापर करू शकत नाहीत. यामुळे मेंदूला असा भ्रम होतो की शरीर उपाशी आहे, परिणामी भूक असामान्यपणे वाढते किंवा पोट भरल्याशिवाय सतत खाण्याची इच्छा होते.
ऊर्जेसाठी पेशींमध्ये पुरेसे ग्लुकोज न पोहोचल्यामुळे मुलाला असामान्यरित्या अशक्तपणा, थकवा किंवा सुस्तपणा जाणवतो. मुलं चिडचिड करतात. तसेच मुलांना खरचटले, काप तर ती जखम बरी होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.