Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रोज 'हे' सुपरफूड खा; घरी सहज असते उपलब्ध, शुगर वाढण्याचे टेन्शन विसराल

Shreya Maskar

मधुमेह

मधुमेहींसाठी सुपरफूड्स म्हणजे पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. ज्यात उच्च फायबरयुक्त आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ असतात. जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास, दाह कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.

Diabetes | pinterest

पालेभाज्या

पालक या हिरव्या भाजीमध्ये कॅलरीज आणि कर्बोदके कमी असतात, तरीही फायबर, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.

Leafy Greens | pinterest

बेरी

स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे ते एक पौष्टिक गोड पदार्थाचा पर्याय ठरतात. तसेच यात नैसर्गिक साखर असते.

Berries | pinterest

सुकामेवा- बिया

बदाम, अक्रोड आणि चिया सीड्समधून आरोग्यदायी फॅट्स, मॅग्नेशियम आणि फायबर मिळतात. जे भूक आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Dry Fruits & Seeds | pinterest

कडधान्ये/डाळी

डाळी हे वनस्पती आधारित प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत. यात फायबर, प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे घटक रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत आणि इंसुलिनचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

Legumes/Pulses | pinterest

दालचिनी- हळद

दालचिनी- हळद या मसाल्यांमध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात. दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते。 तसेच, हळदीतील कर्क्युमिन शरीरातील सूज कमी करून रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास आणि मधुमेहाचा धोका टाळण्यास मदत करते.

Cinnamon | pinterest

ग्रीक योगर्ट

ग्रीक योगर्ट हे साध्या दह्याला गाळून बनवले जाते. यात साध्या दह्यापेक्षा खूपच कमी कर्बोदके असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Greek Yogurt | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : चपाती की भाकरी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी जास्त फायदेशीर काय? शुगर राहील कंट्रोलमध्ये

Diabetes | saam tv
येथे क्लिक करा...