Diabetes : चपाती की भाकरी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी जास्त फायदेशीर काय? शुगर राहील कंट्रोलमध्ये

Shreya Maskar

मधुमेह

मधुमेह रुग्णांनी आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यावे. कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, स्टार्च नसलेल्या भाज्या, प्रथिने आणि जास्त फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

Diabetes | pinterest

भाकरी की चपाती?

मधुमेही रुग्णांसाठी भाकरी चपातीपेक्षा जास्त फायदेशीर असते, कारण ती सहसा भरड धान्यांच्या (जसे की ज्वारी, बाजरी किंवा नाचणी) पिठांपासून बनवलेली असते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

Bhakri or Chapati? | pinterest

भाकरी फायदे

गव्हाची चपाती भाताला एक हेल्दी पर्याय असली तरी, भाकरी रक्तातील साखरेवर अधिक चांगले नियंत्रण ठेवते. वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते.

Bhakri | pinterest

कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI)

ज्वारीपासून बनवलेल्या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) गव्हाच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे तुम्ही रोज जेवणामध्ये नक्कीच भाकरी खाऊ शकता.

GI | pinterest

फायबरचे प्रमाण

भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची अचानक वाढ कमी होण्यास मदत होते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.

Fiber Content | pinterest

भाकरीचे प्रकार

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी , ज्वारी, बाजरी, सातू आणि राजगिरा या धान्यांच्या भाकरी सर्वात फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये प्रथिने, लोह, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Types of Bhakri | pinterest

ग्लूटेन-मुक्त

ज्वारी आणि बाजरीच्या भाकऱ्या ग्लूटेन-मुक्त असतात. हे पचनास हलके असल्याने वजन कमी करण्यास आणि मधुमेही रुग्णांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात.

Bhakri | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : कडक उन्हामुळे वाढते BP अन् शुगर; कुणाला सर्वाधिक धोका?

BP - Diabetes | saam tv
येथे क्लिक करा...