BP - Diabetes : कडक उन्हामुळे वाढते BP अन् शुगर; कुणाला सर्वाधिक धोका?

Shreya Maskar

उन्हाळा

सध्या महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. प्रचंड गरम होते, ज्यामुळे चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात डायबिटीज आणि बीपीच्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी.

Summer Season | pinterest

उन्हाचा BP वर परिणाम

उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. परिणामी, चक्कर येणे, अशक्तपणा आणि बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो.

BP | pinterest

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात जितके पाणी प्यावे तितके कमी असते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या भासते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे.

Dehydration | pinterest

रक्तातील साखर वाढते

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर वाढू शकते. उष्णतेमुळे साखरेची पातळी वेगाने कमी-जास्त होऊ शकते.इन्सुलिनचा परिणाम सामान्यपेक्षा वेगळा असू शकतो.

Rising Blood Sugar Levels | pinterest

सर्वात जास्त धोका कोणाला?

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांना उन्हामुळे जास्त त्रास होतो. वृद्धांमध्ये हीट स्ट्रेसचा धोका जास्त असतो. तसेच कडक उन्हाचा हृदयविकार, लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना देखील प्रचंड त्रास होऊ शकतो.

Risk | pinterest

काळजी कशी घ्यावी?

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी उन्हाळ्यात स्वतःची विशेष काळजी घ्यावी. दिवसभर नियमितपणे पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स प्या.

Take Care | pinterest

नियमित तपासणी

तुमचा रक्तदाब आणि साखर नियमितपणे तपासून घ्या. जेणेकरून काही गंभीर असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. तसेच या रुग्णांनी दुपारच्या तीव्र उन्हात जाणे टाळा.

Regular Monitoring | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : वेळीच व्हा सावध! रोजच्या 'या' चुकांमुळे हळूहळू वाढतंय तुमचं BP

High Blood Pressure | saam tv
येथे क्लिक करा...