Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Crime News: धक्कादायक! धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग, पुण्यातील खळबळजनक घटना, जबरदस्तीने स्वतःचा नंबर केला सेव्ह

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune: पुण्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मूळच्या पश्चिम बंगाल येथील एका तरुणीचा रिक्षा चालकानेच विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दिनांक १६ मार्च) पुणे विद्यापीठात घडला आहे. या प्रकरणात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, १८ वर्षीय तरुणी कोथरूड एमआयटी कॉलेजपासून पुणे विद्यापीठाकडे सचिन नावाच्या अनोळखी रिक्षा चालकाच्या रिक्षामधून जात होती. या प्रवासादरम्यान या रिक्षा चालकांनेच या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. झालेला प्रकार तरुणीने चतुशृंगी पोलिसांना सांगितल्यानंतर आरोपी रिक्षा चालकावर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

या रिक्षा चालकाने प्रवासा दरम्यान रिक्षा पुणे विद्यापीठामध्ये थांबवत तिचा हात पकडला आणि जवळीक साधत तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या तरुणीने रिक्षा चालकाला विरोध करत रिक्षामधून बाहेर उडी मारली. मात्र, तरी देखील त्याने जबरदस्तीने तिचा मोबाईल घेऊन त्याचा स्वतःचा नंबर तिच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून दिला. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस पुढील तपास करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT