Raj Thackeray: शिवतिर्थावर राजगर्जना! पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? टीझरची होतेय जोरदार चर्चा

MNS: मनसेकडून राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

Raj Thackeray Padawa Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्याची सध्या मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून राज ठाकरेंच्या या सभेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्याआधी मनसेकडून या सभेचा टीझर ट्विट करण्यात आला आहे.  ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥, असे लिहित मनसेतर्फे हा टिझर ट्विट केला गेला आहे.

या टिझरमुळे राज ठाकरे गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेकडून राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला होणारी सभाही वादळी होणार असल्याचे दिसत आहे.

Raj Thackeray
Kisan Helpline : शेतकऱ्यांनो...! नुकसानीची माहिती मोबाईल क्रमांकावर पाठवा; कृषिमंत्र्यांकडून नंबर जारी

दरवर्षी गुढी पाडव्याला (Gudipadwa) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवतिर्थावर धडाडते. आता २२ मार्च रोजीही राज ठाकरे यांची सभा आहे. यामुळे मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. आता जारी केलेला टिझर (Mns Teaser) वरुन राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुक्ता ताणली गेली आहे. यामुळे हा टेलर असून पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर दिसणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात येत आहे.

Raj Thackeray
Ahmednagar News : संगमनेर-अकोले रस्त्यावर भीषण अपघात; ३ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, हृदयद्रावक घटना

मनसेकडून ट्विट करण्यात आलेल्या या टीझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. टिझरमध्ये हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असे म्हटले आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्ष, शिंदे-ठाकरे वाद अशा अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे बोलणार असल्याने ते नेमका कोणावर निशाणा साधणार, याकडे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता मुंबई महापालिकेसह काही मोठ्या महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने राज ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.यामुळे राज ठाकरे यांचे भाषण वादळी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com