Lalbaugcha Raja Letter Saam TV
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja: बाप्पा माझ्या नवऱ्याला सुबुद्धी दे; लालबागच्या राजाकडे महिलेचं साकडं

Jagdish Patil

रुपाली बडवे -

मुंबई: लालबागच्या राजावर (Lalbaugcha Raja) अनेक भाविकांची श्रद्धा आहे. मुंबईसह राज्यभरातील भाविक आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईत (Mumbai) येत असतात. मात्र, मागील दोन वर्ष कोरोना काळामुळे त्यांना येता आलं नाही. त्यामुळे यावर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे.

अशातच लालबाग राजाच्या मंडळाने भाविकांनी बाप्पाचरणी अर्पण केलेल्या निधी आणि दागिन्यांची मोजणी सुरू केली. या मोजणीत पैसे आणि दागिन्यांसह भाविकांनी गणपती बाप्पांसमोर काही पत्र देखील ठेवली आहेत. या पत्राद्वारे त्यांनी आपल्या इच्छा, मागण्या देवाजवळ पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ -

आजपर्यंत आपण अनेक भक्तांनी आपली गाऱ्हाणी देवासमोर हक्काने मांडलेली पाहिलं आहे. तसंच अनेकजन देवाकडे आपणाला हवी असणाऱ्या गोष्ट मिळावी, एखादी इच्छा पुर्ण व्हावी यासाठी साकडं देखील घालत असतात. मात्र, आज सकाळी लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या निधी आणि सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजणी सुरू केली. यावेळी एका महिलेने गणपती चरणी अर्पण केलेल्या पत्रामध्ये चक्क 'नवऱ्याला सुबुद्धी दे' असा मजकूर लिहला आहे.

हे पत्र सध्या चर्चेचा विषय बनलं असून आपल्या लाडक्या देवाजवळ भाविक काय-काय गाऱ्हाणी मांडू शकातात हे या पत्रामधून समोर आलं आहे. या पत्रामध्ये महिलेनं लिहलं आहे. 'देवा माझ्या घरी सुख शांती लाभो. माझ्या मुलांच भविष्य चांगलं राहो, त्याच्या आयुष्यामध्ये सदैव आनंद रहावा. माझ्या नवऱ्यासोबतच नातं सुधरो आणि त्याला सुबुद्धी दे!' अशी मागणी गणपती बाप्पाच्या चरणी एका महिलेने केली आहे.

दरम्यान, आज सकाळपासून बँकेचे कर्मचारी आणि मंडळाचे सदस्य असे जवळपास ८० जणांकडून लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि निधीची मोजणी सुरू करण्यात आली आहे.

मागील गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेली देणगी एकूण ८ कोटींच्या घरात गेली होती. आता 2 वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदा दुप्पटीने देणगी येईल, अशी माहिती मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT