Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

Narayan Rane: राणेंच्या जुहूतल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक रवाना घडामोडीना वेग

नारायण राणेंच्या याच्या जुहूतल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक रवाना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद सुरू असतानाच, आता शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता असलेल्या मुंबई (Mumbai) महापालिकेने (Municipal Corporation) नारायण राणे (Narayan Rane) यांना नोटीस बजावली होती. नारायण राणेंच्या याच्या जुहूतल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक रवाना झाले आहे. नारायण राणे विरूद्ध शिवसेनेच्या वादात आता बंगला प्रकरणाची भर पडत आहे. यामध्ये बंगल्याच्या बांधकामात अनियमिततेचा आरोप (Allegations) यावेळी करण्यात आले आहे. मुंबई पालिका नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करणार? राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची पाहणी आणि बेकायदा बाधकामाची मोजणी करण्यासंदर्भात ही नोटीस बजावली होती. (A team Mumbai Municipal Corporation left inspect Narayan Rane bungalow in Juhu)

हे देखील पहा-

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना वाद सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांवर आरोप करण्यात आले होते. यानंतर लगेच नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका तर केली होती, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. यामुळे नारायण राणे आणि शिवसेना वाद दिवसेंदिवस चिघळत येत आहे, असे असतानाच आता मुंबई महापालिकेकडून राणे यांना नोटीस बजावून कारवाईच्या मागे लागले आहे. जुहू येथील बंगल्याच्या पाहणी आणि मोजणीसंदर्भात ही नोटीस आहे.

मुंबई महापालिकेच्या के वेस्ट वॉर्ड (अंधेरी वेस्ट) द्वारे वॉर्ड अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस राणे यांना पाठवण्यात आली होती. एमएमसी अॅक्ट अंतर्गत सेक्शन ४८८ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली होती. के- वेस्ट वॉर्ड आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्यावर येऊन तपासणी आणि बेकायदा बांधकामाविषयी मिळालेल्या तक्रारीची खात्री करून घेणार आहेत, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. बंगल्याच्या बांधकामा संदर्भात कागदपत्रे तयार ठेवावेत, असेही या नोटिसमध्ये म्हटले आहे.

राणेंच्या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने दौंडकर यांनी पुन्हा महापालिका प्रशासनाला यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले होते. यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT