Pune Accident News saam tv
मुंबई/पुणे

पुणे: मुलीला शाळेत सोडायला जाताना अपघात; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी येथे घडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे - सासवड (Saswad) रस्त्यावर बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. शाळेत सोडविण्यासाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. पुणे-सासवड (Pune) रोडवर मुलीला शाळेत सोडविण्यासाठी जात असताना ट्रकच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाला. तर मुलीला उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर समोर सातववाडी येथे घडला आहे. नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) आणि मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्याची नवे आहे. मीनाक्षी ही साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर येत आहे.

हे देखील पाहा -

आपल्या मुलीला सोडण्यासाठी निखील साळुंखे हे फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून चालले होते. ग्लायडिंग सेंटर इथं पोहोचले असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक बसल्यामुळे निखील साळुंखे हे खाली पडले आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मीनाक्षीला देखील गंभीर दुखापत झाली होती.

स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक दिलीप कुमार पटेल याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ट्रक चालक दिलीप कुमार पटेल याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajay Devgan: 'आता प्रेमाचा अर्थ बदलला...; लग्नाला एक्सपायरी डेट हवी या काजोलच्या विधानावर अजयने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

साईबाबांच्या दर्शनाने अंध मुलाला दृष्टी? साई मंदिरात अंधश्रद्धा की चमत्कार?

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

लग्नसराईत सोनं स्वस्त! २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले, वाचा आजचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT