Ganesh Festival Mumbai BMC Saam TV
मुंबई/पुणे

Ganesh Festival: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर BMC कडून धोकादायक पुलांची यादी जाहीर; केलं 'हे' आवाहन

गणेश भक्तांनी गणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई: मुंबईमधील गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सूचना करत, मुंबईमधील या धोकादायक पुलांची नावं देखील जाहीर केली आहेत.

‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ४ पूल आणि ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणारे ९ पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक स्वरुपाचे झालेले आहेत. तसेच, या १३ पुलांपैकी काही पुलांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत किंवा पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार आहेत.

तरी सर्व गणेश भक्तांनी गणेश आगमन आणि विसर्जनासाठी पुलावरुन जाताना ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये तसेच नाच-गाणी इत्यादी बाबी टाळाव्यात. त्याचबरोबर पुलावर अधिक वेळ न थांबता पुलांवरुन त्वरित पुढे जावे.

पाहा व्हिडीओ -

महानगरपालिका पालिका हद्दीतील ‘मध्य रेल्वे लाईन’ वरुन जाणा-या ४ पुलांमध्ये घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज, करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज, भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.

तर, ‘पश्चिम रेल्वे लाईन’ वरुन जाणाऱ्या ९ पुलांमध्ये मरिन लाईन्स रेल ओव्हर ब्रिज, ग्रँटरोड व मुंबई सेंट्रलच्या दरम्यान असणारा फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज, मुंबई सेंट्रलच्या जवळ असणारा बेलासिस पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज, प्रभादेवी कॅरोल रेल ओव्हर ब्रिज, दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज यांच्यासह ग्रँटरोड व चर्नीरोडच्या दरम्यान असणारे सँडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज, फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज आणि केनडी रेल ओव्हर ब्रिज या पुलांचा समावेश आहे.

करीरोड रेल ओव्हर ब्रिज, साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) रेल ओव्हर ब्रिज किंवा चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज आणि भायखळा रेल ओव्हर ब्रिज या पुलांवर एकावेळेस १६ टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

तसेच ‘मध्य रेल्वे लाईन’ वरील चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज (आर्थर रोड) आणि करीरोड रेल ओव्हर ब्रिज पार करताना बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस यांच्याद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT