CBD Belapur Crime
CBD Belapur Crime Saam Tv
मुंबई/पुणे

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पत्नीवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Satish Daud-Patil

बेलापूर : घरात घरकाम करणाऱ्या मोलकरणीला मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) आणि त्याच्या पत्नीविरोधात अॅट्रोसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर (CBD belapur) पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पाटील आणि पत्नी रुचा पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Of Atrocity Has Been Registered Against Assistant Police Inspector And His Wife in)

माहितीनुसार, मोलकरीण महिला पोलीस निरीक्षका संदीप पाटील यांच्या घरी घरकाम करत होती. मात्र अधिकचे काम असल्याने तिने 6 महिन्यांपूर्वी काम सोडले होते. अशातच मोलकरणीच्या मुलाकडून नकळत संदीप पाटील यांच्या घरी फोन लागला. यावरून पाटील यांनी मोलकरणीसह तिच्या पतीला फोन करून शिवीगाळ केली. यासोबतच रात्री राहत्या घरी येऊन जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांची पत्नी रुचा पाटील यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरणीने अधिकच्या कामाला नकार देत काम सोडले होते. त्याच्या रागातून पाटील यांनी ही मारहाण केल्याचं पीडितेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पीडितेच्या मुलाकडून चुकीने फोन लागल्याच्या कारणातून हा सर्व प्रकार घडला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT