महाविद्यालयात घुसून राडा घालणाऱ्या गनिमी कावा संघटनेवर गुन्हा दाखल saam tv
मुंबई/पुणे

महाविद्यालयात घुसून राडा घालणाऱ्या गनिमी कावा संघटनेवर गुन्हा दाखल

गनिमी कावा संघटनेने महाविद्यालयात घुसून राडा घातला, या प्रकरणी संघटनेवर कोरोना नियम न पाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

गुण वाढवून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गनिमी कावा संघटनेने महाविद्यालयात घुसून राडा घातला, या प्रकरणी संघटनेवर कोरोना नियम न पाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी येरवडा येथील 57 वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष व त्यांच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  भादवी कलम 323, 504, 355, 188, 143, 147, 149 व आपत्ती व्यवस्थापन कायदा यासोबतच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या महाविद्यालयातील अभिजित पवार या क्लार्कने एका विद्यार्थिनीकडे गुण वाढवून देण्याच्या बहाण्याने शरीर सुखाची मागणी केली होती.  तिने हा प्रकार महाविद्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्याला सांगितला होता, गनिमी कावा संघटनेला सदर घटनेची माहिती मिळताच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात राडा घातला, या प्रकरणी अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

Edited by Ashwini jadhav kedari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Pujan: गौरी पूजेत देवीला कोणती फूले वाहतात? जाणून घ्या

Fashion Tips: फिटिंग ड्रेसमध्ये तुम्हाला देखील अनकम्फर्टेबल वाटत असेल; तर खरेदी करताना या टिप्स करा फॉलो

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा - गुणरत्न सदावर्ते

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, त्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या - मुधोजी राजे भोसले

Manoj Jarange: सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे भडकले|VIDEO

SCROLL FOR NEXT