A case has been registered against Kirit Somaiya and his son Neil Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

INS विक्रांतच्या नावाखाली पैसे लाटल्याचा आरोप; किरीट सोमय्यांसह मुलगा नीलवर गुन्हा दाखल

Kirit Somaiya Latest News: ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुरज सावंत

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर INS विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली 58 कोटी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर बुधवारी रात्री उशीरा ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against Kirit Somaiya and his son Neel for laundering money under the name of INS Vikrant)

हे देखील पहा -

ट्रॉम्बे - मानखुर्द गावात राहणारे फिर्यादी माजी सैनिक बबन भिमराव भोसले यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भारतीय नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान सुरू केले होते. या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले होते. मात्र हे पैसे राज्यपाल यांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

राऊतांचे सोमय्यांवर आरोप -

राऊत आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, 2013-14 आणि 2014-15 मध्ये आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाला भंगारात काढण्यात आलं. यामुळे लोकांमध्ये संताप होता. या जहाजाचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी तेव्हा झाली होती. किरीट सोमय्या यांनी या जहाजासाठी सेव्ह विक्रांत चळवळ सुरु केली आणि लाखो लोकांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम जवळपास 57 ते 58 कोटी रुपये होती असा दावा राऊतांनी केला. मात्र हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत असा खळबळजनक दावा राऊतांनी केली आहे. यावेळी त्यांनी एक पत्रकही दाखवले. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून या प्रकरणात माहिती मागवली होती. असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं आरटीआयमध्ये उघड करण्यात आलं आहे. याचाच संदर्भ देत राऊतांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

आयएनएस विक्रांत प्रकरण -

आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसै जमा केले होते. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

SCROLL FOR NEXT