प्रसिद्ध 'तळवळकर्स जिम' विरोधात २०६ कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Saam Tv News
मुंबई/पुणे

प्रसिद्ध 'तळवळकर्स जिम' विरोधात २०६ कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

२०१६ ते २०१९ या कालावधीत बँकेची २०६ कोटी ३५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार एक्सीस बॅकेकडून करण्यात आली आहे.

सुरज सावंत

मुंबई: व्यायामशाळा क्षेत्रातील प्रसिद्ध तळवळकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडशी संबंधीत आठ व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०६ कोटी रुपयांच्या बुडीत कर्जाप्रकरणी गुरूवारी मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कर्ज घेऊन बुडवल्याप्रकरणी राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been filed against the famous 'Talwalkars Gym' for defaulting on a loan of Rs 206 crore)

हे देखील पहा -

तळवळकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे गिरीश मधुकर तळवळकर, प्रशांत सुधाकर तळवळकर, विनायक गवांदे, अनंत गवांदे, हर्ष भटकर, मधुकर विष्णू तळवणकर, दिनेश राव व गिरीश नायक यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत बँकेची २०६ कोटी ३५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार एक्सीस बॅकेकडून करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने सहा महिने प्राथमिक चौकशी केली. त्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १४ ऑक्टोबरला याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

२०१९ मध्ये कर्जाची मुद्दल व व्याजाची रक्कम भरली गेली नाही. १९३२ मध्ये या व्यायामशाळेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर नावारुपाला आलेल्या या व्यायामशाळा ग्रुपचे ८० शहरांमध्ये १५२ हेल्थक्लब सुरू करण्यात आले होते. त्याचे दोन लाखांहून अधिक सदस्य होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT