Pune Car-Bikes Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यातील कात्रज परिसरात विचित्र अपघात, कारचालकाने ४ ते ५ दुचाकींना उडवलं; भयानक VIDEO

Pune Car-Bikes Accident News: पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने ३ ते ४ दुचाकींना जोरदार धडक दिली.

Satish Daud

Pune Car-Bikes Accident News

पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने ३ ते ४ दुचाकींना जोरदार धडक दिली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, दुचाकीस्वार जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातात दुचाकींसह कारचं मोठं नुकसान झालं आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कात्रज मांगडेवाडी, सुंदरनगर परिसरात (Pune News) बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतलं असून अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांना रुग्णालयात दाखल केलं आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून पुण्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कात्रज नवीन बोगद्यातही असाच विचित्र अपघात झाला होता. एकाच दिशेने निघालेल्या पाच गाड्या एकमेकांना धकडल्या होत्या.

अपघातामुळे बोगद्यात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती. या अपघातात एक महिला जखमी झाली होती. तसेच सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT