बायकोशी वाद झाला म्हणून 7 वर्षाच्या मुलीची केली गळा दाबून हत्या; स्वतःही पिलं विष 
मुंबई/पुणे

बायकोशी वाद झाला म्हणून 7 वर्षाच्या मुलीची केली गळा दाबून हत्या; स्वतःही पिलं विष

पत्नी शोफिया स्वतः नोकरी करून घर चालवत होती व अनिसच्या जुगाराच्या व्यसनाला कंटाळून लेक मायरासह तिने वेगळे होण्याची मागणी केली होती.

कल्पेश गोरडे

मुंब्रा : पत्नीशी झालेल्या भांडणामुळे चिडलेल्या नवऱ्याने रागाच्या भरात आपल्याच लहान मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा (Mubra) परिसरात घडली आहे. मुलीला मारल्यानंतर स्वतः विष प्राशन करून आरोपीने पोलिसांना फोन करून सर्व घटनेची हकीकत सांगितली.

हे देखील पहा -

मुंब्र्यातील बाबे कॉलनी मध्ये अर्शद मंजिल (Arshad Manzil) या इमारतीमध्ये शोफिया मालदार, ही पती अनिस आणि 7 वर्षीय मुलगी मायरासोबत राहत होती. अनिस काही काम करत नव्हता मात्र त्याला जुगाराचे व्यसन होते. शोफिया स्वतः नोकरी करून घर चालवत होती व अनिसच्या जुगाराच्या (Gambling) व्यसनाला कंटाळून लेक मायरासह तिने वेगळे होण्याची मागणी केली होती. याच वादातून चिडलेल्या अनिसने रागाच्या भरात रात्री आपल्या निष्पाप मुलीला घेऊन मुंब्रा बायपास (Mumbra Bypass) गाठले व तिथेच तिचा गळा दाबून हत्या केली.

दरम्यान अनिस याने स्वतः विष पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याने 100 नंबरवर फोन करत पोलिसांना (Police) त्यांने केलेल्या कृत्याची माहिती दिली. मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह शवविच्छेदननासाठी पाठविला असून अनिसला जेजे रुग्णालयात (J J Hospital) दाखल केले आहे. अनिस याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. अशी माहिती यावेळी मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून महागड्या दुचाकीच्या स्पीडो मीटरची चोरी

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT