Peb Fort News :
Peb Fort News : Saam Digital
मुंबई/पुणे

Peb Fort News : मुंबईची IT इंजिनीअर तरुणी पेब किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळली, ७ तास चाललं रेस्क्यू ऑपरेशन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karjat Matheran Peb Fort Trek

कर्जत तालुक्यातील माथेरानजवळील पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेली २७ वर्षीय आयटी इंजिनीअर तरूणी ४०० फूट खोल दरीत कोसळली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मुंबईतील अंधेरी येथील २७ वर्षीय तरूणी ऐश्वर्या धालगडे पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती. पेब किल्ल्यावरून परतत असताना तिचा पाय घसरला आणि ती ४०० फूट खोल दरीत पडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाच जणांचा ग्रुप पेब किल्ल्यावर (Peb Fort) ट्रेकिंगसाठी गेला होता. त्यात ऐश्वर्या देखील होती. ते सर्व जण पेब किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरून ते पायथ्याशी येत होते. व्ही आकाराच्या दरीजवळ ऐश्वर्याचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. दरीतील झाडामुळं ती बचावली. तिच्या कंबरेला आणि पायाला दुखापत झाली आहे.

नेमकं काय घडलं?

ऐश्वर्या ही ओशिवराची (Oshiwara) रहिवासी आहे. तिच्यासोबत अनिकेत मोहिते आणि अंकिता मराठे हे अंधेरीतीलच (Andheri) दोन मित्र आणि रुपेश वीर आणि तन्वी पार्टे हे दोघे ठाण्यातील मित्र होते. पाचही जण पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. तेथून तिथून ते परत येत होते. एक किलोमीटरवर आले असता, ऐश्वर्याचा पाय घसरला.

Peb Fort News

घटनेनंतर तात्काळ त्यांच्यातील एका मित्राने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. माथेरान पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नेरळजवळील (Neral-Matheran) आंबेवाडी येथील आदिवासींनीही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यानंतर पोलीस, 'सह्याद्री'चे स्वयंसेवक, वन कर्मचारी, डॉ. सचिन वाणी आणि इतर घटनास्थळी पोहोचले. तेथून जवळच असलेल्या रस्त्यावर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली.

ऐश्वर्याला वाचवण्यासाठी तब्बल सात तास मोहीम सुरू होती. दुपारी दीड वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन रात्री आठ वाजेपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाले. या कालावधीत बचावपथकाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. जिथून ऐश्वर्या दरीत कोसळली आणि ज्या ठिकाणी पडली तिथला भाग हा प्रचंड उताराचा होता. हे सर्व अडथळे पार करत दोराच्या साह्याने तिला वाचवण्यात यश आले. तरूणीच्या बचावकार्या दरम्यानचे फोटो रायगड पोलिसांनी त्याच्या एक्स @RaigadPoliceया अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

चार तास पायी चालले, तरुणीला खांद्यावरून अॅम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवले

बचावपथकाने सोबत दोर आणि स्ट्रेचर नेले होते. ऐश्वर्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तपासणी केली. ती सुखरूप होती. तिला स्ट्रेचरवरून बाहेर आणण्यात आले. बचावपथक, पोलीस आणि आदिवासींनी तिला खांद्यावर खडतर वाटेतून चार तास पायी चालत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. बदलापूरच्या पाटकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी सांगितले की, दरीत कोसळलेल्या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

SCROLL FOR NEXT