mumbai lift Accident
mumbai lift Accident Saam tv
मुंबई/पुणे

दुर्दैवी! लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू, मालाड मधील शाळेतील प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मालाड येथील एका खासगी शाळेच्या (School) लिफ्टमध्ये अडकून एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. खासगी शाळेत काम करणाऱ्या जेनेली फर्नांडिस यांना गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेली माहिती अशी, ही घटना मालाड चिंचोली पाठक येथील सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये घडली आहे. जेनेली फर्नांडिस यांनी जून २०२२ मध्ये या शाळेत (School) सहाय्यक शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

शुक्रवारी साधारणपणे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ६ व्या मजल्यावरील लेक्चर संपवून फर्नांडिस या दुसऱ्या मजल्यावरील स्टाफ रुमकडे जाण्यासाठी निघाल्या. यासाठी लिफ्टचे बटण दाबले लिफ्टाचा दरवाजास उघडताच फर्नांडिस यांनी आता पाऊल टाकले. पण लिफ्टचा दरवाजा बंद ना होता लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. त्यामुळे त्या लिफ्ट मध्येच अडकून राहिल्या.

यावेळी इतर सहकाऱ्यांनी मदत करण्यासाठी धावाधाव केली, त्यांना लिफ्टमधून बाहेर काढले. यानंतर त्यांनी त्वरित मालाड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. जखमी अवस्थेत फर्नांडिस यांना जवळच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मालाड पोलिसांनी सदर घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली आहे. मात्र लिफ्टची देखरेख करणाऱ्या कंपनीच्या देखभाली बाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT