धक्कादायक : अचानक कारचा दरवाचा उघडल्याने 24 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू; अपघात CCTV मध्ये कैद ! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

धक्कादायक : अचानक कारचा दरवाचा उघडल्याने 24 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू; अपघात CCTV मध्ये कैद !

राँग साईडने दुचाकीवरुन पुढे जात असताना त्याच बाजुला पार्क केलेल्या सेलेरियो कार मध्ये बसलेल्या व्यक्तीने मागे - पुढे न पाहता अचानक कारचा दरवाजा (Car door) उघडला.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : राँग साईडला पार्क असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने, त्याच साईडनेच जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे - आळंदी रोडवरती (Pune - Alandi Road) घडली आहे. दरम्यान या अपघाताची सीसीटीव्ही फूटेज (CCTV footage) आता समोर आल्याने याची भयानकता दिसून येत आहे.

हे देखील पहा -

राम बाळासाहेब बांगल (Ram Balasaheb Bangal) या 24 वर्षाच्या तरुणाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. राम बांगल हा आपला चुलत भाऊ किशोर राजन बांगल यांच्या सोबत पुणे - आळंदी रोडवरुन जात असताना राँग साईडने दुचाकीवरुन पुढे जात असताना त्याच बाजुला पार्क केलेल्या सेलेरियो कार मध्ये बसलेल्या व्यक्तीने मागे - पुढे न पाहता अचानक कारचा दरवाजा (Car door) उघडल्याने राम बागल हा कारच्या दरवाज्याला धडकून खाली पडला.

त्यानंतर त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या आयसर ट्रक चालकाच्या चाका खाली येऊन रामचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दिघी पोलिसांनी किशोर राजेंद्र बांगल, सुरज जगन्नाथ घुले, सुमित कालिदास पराडे आणि एका अज्ञात आयसर ट्रक चालका विरोधात दिघी पोलिसांत (Dighi Police) गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT