Pune Crime Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : १७ वर्षीय मुलीवर आजोबा, काका, वडिलांकडून ६ वर्ष अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यात आजोबा, चुलता आणि वडिलांकडून एका १७ वर्षीय मुलीवर सलग सहा वर्षांपासून अत्याचार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने कॉलेजमधील समुपदेशन तासाच्यावेळी आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला.

पीडित मुलीने सांगितलेला घटनाक्रम ऐकून समुपदेशकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पीडित मुलीचे तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आजोबा, काका आणि वडिलांवर अत्याचाराचा गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी नराधम बापाला बेड्या देखील ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. पीडितेच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२ -१३ वर्षाची असताना मुळगावी तिच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार अत्याचार केले.

यावेळी ७० वर्षांच्या आजोबांनी देखील तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. एप्रिल २०१८ मध्ये पीडिता पुण्यात परतल्यानंतर तिने या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडीलांना कळविली. मात्र, वडीलांनी सुद्धा तिच्यावर अत्याचार केले. गेल्या अनेक वर्षांपासून पीडिता हे अत्याचार सहन करत होती. दरम्यान, पीडितेने तिच्या कॉलेजमधील एका कार्यक्रमात आपल्यासोबत घडलेला घटनाक्रम सांगितला.

पीडितेसोबत घडलेली घटना एकून समुपदेशकानाही धक्का बसला. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी नराधम बापास अटकही केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT