Pravin Darekar Saam TV
मुंबई/पुणे

प्रवीण दरेकर यांच्या विरोधात 904 पानी आरोपपत्र; 'या' दोघांच्या नावाचाही समावेश

प्रवीण दरेकर आणि इतर दोन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सुरज सावंत

मुंबई - भाजपा नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर आणि इतर दोन आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रात प्रवीण दरेकर यांच्या सोबत प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचा देखील समावेश आहे. प्रवीण दरेकरांविरोधात तब्बल 904 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात शुक्रवारी (१३ मे) आरोप पत्र दाखल झाला. एकूण ९०४ पानांचा आरोप पत्रात तिन्ही आरोपींविरोधात आयपीसी कलम १९९ , २०० , ४०६ , ४१७ , ४२० ४६५ ,४६८ ,४७१ आणि १२० -ब अंतर्गत आरोप आहे.

पोलिसांनी एकूण २९ साक्षीदारांची साक्ष्य नोंदविली आहे. त्यात ३ पोलीस अधिकारी , एक डेप्युटी कलेकटर , काही शासकीय अधिकारी तर काही मुंबई बँकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र या प्रकरणात मुंबई हायकोर्टा तर्फे दरेकर यांना अटक पूर्व जमीन देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT