Saam Tv
चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी बाजारात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण कशाचा वापर करावा, कोणते आपल्या स्किनसाठी सूट होईल किंवा योग्य असेल यात आपण कंफ्यूज होतो.
चेहऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी रेजर हा बेस्ट ऑप्शन आहे. याचे रेटिंग १० पैकी ७ आहे. रेजरने शेव केल्याने चेहऱ्यावरचे केस सेफली कमी करता येतात. शेव केल्याने जाडे केस येतात हे खरं मानू नये
काही महिला हळद लावून चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. १०/३ याचे रेटिंग आहे. परंतु यामुळे केस पुर्णपणे निघून जात नाही.
चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करण्यासाठी बाजारात हेअर रिमूव्हल उपलब्ध असते. याचेही रेटिंग १०/३ आहे. कोणत्याही कंपनीचे क्रिम हे उत्तमच असते. परंतु क्रिममुळे तात्पुरते केस काढता येतात.
थ्रेडिंग ही पद्धत हेअर रिमूव्हलसाठी बेस्ट मानली जाते. पण याला १०/४ रेटिंग आहे. थ्रेडिंग केल्यामुळे स्किन जास्त ड्राय आणि लवकर सुरकुत्या पडतात. पिंगमेंटेशनटची समस्या देखील वाढते.
ट्रिमरने केस काढणे ही पद्धत तात्पुरती आहे. स्किन एसपर्ट कडून याला १० / ४ पर्यंत रेटिंग मिळते . परंतु एका डायरेक्शनचे केस काढणारे ब्लेड निवडल्यास चांगला फायदा होतो.
हेअर रिमूव्ह करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टेक्निक सुद्धा वापरली जाते. यामुळे चेहऱ्यावरचे केस किंवा पांढरे केस सहजपणे निघून येतात.पण यामुळे पिगमेंटेंशनच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
लेजर हेअर रिमूव्हलची रेटिंग ही १०/१० आहे. ही पद्धत केस काढण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. यामुळे कसल्याही वेदना होत नाही याशिवाय चेहऱ्यावरचे केस कायमचे निघून जातात.
चेहऱ्यावर वॅक्सिंग करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे केस तात्पुरता कमी तर होतात याशिवाय पिंपल्स आणि ड्राय स्किनचा त्रास वाढतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.