महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून ८ उपनगरीय विशेष गाड्या!  SaamTV
मुंबई/पुणे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून ८ उपनगरीय विशेष गाड्या!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६.१२.२०२१ (५ तारखेच्या मध्यरात्रीपासून) मध्य रेल्वेकडून प्रवाशांकरीता ८ उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६.१२.२०२१ (५ तारखेच्या मध्यरात्रीपासून) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता ८ उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

तपशील खालीलप्रमाणे -

मेन लाईन - अप विशेष :

• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २.३० वाजता पोहचेल.

• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून ०२.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.४५ वाजता पोहचेल.

मेन लाईन - डाउन विशेष :

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.०० वाजता पोहचेल.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.०० वाजता पोहचेल.

हार्बर लाइन - अप विशेष :

• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.३५ वाजता पोहचेल.

• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.५० वाजता पोहचेल.

हार्बर लाइन - डाउन विशेष :

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०३.०० वाजता पोहचेल.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहचेल.

कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व सुविधेचा लाभ घ्यावा :

प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-१९ योग्य वागणूक पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4 दिवसांत डायबेटीज गायब होणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Tissue Silk Saree Design: लग्न किंवा फंक्शनसाठी नेसा या ७ ट्रेंडी युनिक टिश्यू सिल्क साडी

संसदेतही येणार लाडकी योजना? महिलांना मिळणार 273 जागांचे आरक्षण?

Maratha History: छत्रपती शिवरायांच्या या मावळ्याला खुद्द औरंगजेबही घाबरायचा, थेट मोगल छावणीवर टाकलेली धाड

Maharashtra Live News Update: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

SCROLL FOR NEXT