Mumbai Elphinstone Bridge  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway Block : एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी रेल्वेचा ७८ दिवसांचा ब्लॉक, दररोज चार तास लोकल बंद ठेवली जाणार

Mumbai Elphinstone Bridge : मुंबईतील परळ येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्याचं काम सुरू झालं आहे. या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर ७८ दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान रात्री चार तास लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद राहील.

Alisha Khedekar

परळ येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्याचं काम अंतिम टप्प्यात

या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर ७८ दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार

रात्री चार तास लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक थांबवली जाणार

नवीन डबलडेकर पूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाचं नियोजन सुरू

मुंबई शहरातील परेल येथील ब्रिटिश कालीन पूल काळाच्या पडद्याआड गेला आहे. हा पूल बराच जुना असल्याने तो पाडून त्याजागी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. या पुलाला पाडण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. या पुलाचं पाडकाम करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण ७८ दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन्ही रेल्वे मार्गांवर रात्री किमान चार तास लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या निर्णयाचा काही काळ फटका प्रवाशांना बसणार आहे.

मागील कित्येक महिन्यांपासून मुंबईतील परळ येथे असलेला ब्रिटिश कालीन एलफिस्टन ब्रिज पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र स्थानिकांच्या नकारामुळे याचे काम सुरु होण्यास विलंब झाला. या ब्रिजसोबत अनेक शाळकरी मुलांच्या, नोकरदार वर्गांच्या आणि स्थानिकांच्या जुन्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मात्र हा ब्रिज आता कमकुवत झाला होता त्यामुळे त्याची डागडुजी करणं महत्त्वाचं होत. त्यानुसार या पुलाच पाडकाम करून त्याठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण ७८ दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.

दोन्ही रेल्वे मार्गांवर रात्रीच्या सुमारास चार तास लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे रात्री घरी परतणाऱ्या नोकरदार मंडळींचे हाल होणार आहेत. एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम वेळीच पूर्ण करण्यासाठी दोन्ही रेल्वे प्रशासन ब्लॉकचे नियोजन करण्यास तयार झाले आहे. नियोजित वरळी-शिवडी उन्नत मार्ग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतून जात आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम तसेच नवीन डबलडेकर पुलाच्या बांधकामासाठी दोन्ही रेल्वे प्रशासनांची परवानगी आवश्यक होती. याबाबत ‘महारेल’ने केलेल्या पत्रव्यवहाराला दोन्ही प्रशासनांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकूण ७८ ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली आहे.

हे ब्लॉक रात्री किमान चार तास असतील. दोन्ही रेल्वे प्रशासन ब्लॉकचे नियोजन करणार आहेत. त्या ७८ दिवसांमध्ये अनेक लोकल फेऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द आणि वाहतुकीत बदल केला जाणार आहे. काही दिवसांत अधिक तासांचा ब्लॉक घेता येईल का, याचीदेखील चाचणी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यापासून याचा परिणाम दादर, वरळी, लोअर परळ परिसराच्या रस्ते वाहतुकीवर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणी लवकर करण्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपने आणखी एक डाव टाकला, थेट आमदारचं फोडला, आज कमळ हातात घेणार?

Gold Rate Today: ऐन लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं! १ तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

मोठी बातमी! महायुतीच्या मंत्र्याला कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता, अटक वॉरंटबाबत अपडेट आली समोर

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Rosemary Hair Oil Benefits: अंघोळीच्या पाण्यात टाका रोझमेरी तेल, झपाट्याने होईल केसांची वाढ

SCROLL FOR NEXT