ठाकरे सरकार धावलं मदतीला; Assam अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका Saam Tv
मुंबई/पुणे

ठाकरे सरकार धावलं मदतीला; आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची सुटका

आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेकरिता आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रामधील ६० ते ७० विद्यार्थ्यांना सक्तीचे क्वारंटाईन करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेकरिता (Exam) आसाममध्ये (Assam) गेलेल्या महाराष्ट्रामधील (Maharashtra) ६० ते ७० विद्यार्थ्यांना (students) सक्तीचे क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले होते. त्यानंतर राज्य प्रशासनाने (State Administration) तत्काळ त्याची दखल घेत विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, आसाम मध्ये अडकलेल्या सर्व मुलांची अखेर सुटका करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

रुग्णालयामधून (hospital) सर्व मुलांना आसाम सरकारने (government) काल संध्याकाळी सोडले असल्याची प्रशासनाने दिली आहे. सर्व मुले सध्या न्यू हॉकलॉगच्या (hacklog) रेल्वे स्टेशनवरून (Railways) गुवाहाटीला जाणार आहेत. तेथून ते आज रेल्वेने महाराष्ट्राकडे (Maharashtra) येणाऱ्या ट्रेनमध्ये बसणार आहेत.

कोल्हापूर (Kolhapur) आणि पुणे (Pune) येथील ६० विद्यार्थी इलेव्हन आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेकरिता आसामला गेले होते. ट्रेडमॅनपदाच्या ६ जागांसाठी १२ ते १८ जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार होती. या परीक्षेकरिता हे सर्व विद्यार्थी १ ते ७ जानेवारी दरम्यान आसामला पोहोचले होते. आसाम येथे पोहोचल्यावर त्यांची कोरोना चाचणी न करता त्यांना थेट QUARANTIN करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे (Corona) ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT