Sachin Sawant On Union Budget 2022 Saam Tv
मुंबई/पुणे

Union Budget 2022: 2 कोटी रोजगारांच्या जुमल्यानंतर 60 लाख नोकऱ्यांचा नवा जुमला - सचिन सावंतांची टीका

Union Budget 2022 Political Reactions: २०१९ ला जागतिक बँक अहवालानुसार हा वाटा १३.६% पर्यंत खाली आला. यावर्षीही तो खाली आहे. गेल्या ५ वर्षांत उत्पादन क्षेत्रातील रोजगारात सातत्याने घट झाली असा आरोप सावंत यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर (Union Budget 2022) महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) टीका केली आहे. कॉंग्रेसचे माजी नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी या अर्थसंकल्पाला "नवा जुमला" असं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे. (60 lakh jobs jumla added after 2 crore jobs jumla Sachin Sawant's criticism on union budget 2022)

हे देखील पहा -

सचिन सावंत म्हणाले की, २ कोटी रोजगारांच्या जुमल्यानंतर ६० लाख नोकऱ्यांचा नवा जुमला आहे. २०१६ ला "मेक इन इंडिया" योजना आणली तेव्हा उत्पादन क्षेत्राचा जीडीपी मध्ये १६% वाटा होता. २०२२ पर्यंत हा वाटा जीडीपीच्या २५% पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले होते. २०१९ ला जागतिक बँक अहवालानुसार हा वाटा १३.६% पर्यंत खाली आला. यावर्षीही तो खाली आहे. गेल्या ५ वर्षांत उत्पादन क्षेत्रातील रोजगारात सातत्याने घट झाली असा आरोप सावंत यांनी केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, 2016-17 मध्ये ५.१० कोटी रोजगार या क्षेत्रात होते. 2020-21 पर्यंत ते २.७३ कोटीच राहीले. या क्षेत्राने 46% म्हणजे २.३७ कोटी असलेले रोजगार गमावले आता ६० लाख नवीन रोजगार आकाशातून पडणार का? २५ वर्षांच्या अमृतकालाचा जुमला देण्याआधी २०२२ पर्यंत सुवर्ण कालीन न्यू इंडिया आणणार होते त्याचे काय झाले? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

सचिन सावंत यांनी सरकारला खालील प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत.

१.सर्वांना घरे दिली?

२. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले?

३. शिक्षणात नोंदणी प्रमाण ३५% केले?

४. हाताने मैला उचलणं बंद झाले?

५. शहरातील प्रदुषण संपले?

६. कुपोषण कमी झाले का?

सचिन सावंत यांनी असे अनेक प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर हल्ला केला आहे. याशिवाय महाविकास आघाडीमधील अनेक बड्या नेत्यांनी या अर्थसंपल्पावर टीका करत नाराजी व्यक्त केली. यात उप-मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांसह अनेक नेत्यांनी बजेटवर टीका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT