Mumbai Fire
Mumbai Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai fire Breaks Out: सकाळी चहा करण्यासाठी गॅस सुरु केला, अन् लागली मोठी आग; संपूर्ण कुटुंब भाजले

Priya More

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: मुंबईमध्ये (Mumbai) गॅस गळतीमुळे आग लागून एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या खार (Khar) पश्चिमेकडील हरिचंद्र बेकरीजवळ ही घटना घडली आहे. सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीमध्ये जखमी झालेल्यांना वांद्रे पश्चिमेकडील महापालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खास पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खार पश्चिमेकडील खार दांडा परिसरातील गोविंद पाटील मार्गालगतच्या चंद्र बेकरीजवळील एका घरात गॅस गळतीमुळे ही आग लागली आहे. सकाळी चहा तयार करण्यासाठी गॅस पेटवला. त्यानंतर भटका होत घराला आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमी झालेल्या सगळ्यांना तात्काळ उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या आगीमध्ये सखुबाई जयस्वाल (65 वर्षे) या 45 टक्के भाजल्या आहेत. प्रियांका जयस्वाल (26 वर्षे) ही 51 टक्के भाजली आहे. निकिता मंडलिक (26 वर्षे) ही 45 टक्के भाजली आहे. सुनील जयस्वाल (29 वर्षे) 50 टक्के भाजला आहे. यशा चव्हाण (7 वर्षे) 40 टक्के भाजली आहे. तर प्रथम जयस्वाल हा (6 वर्षे) हा मुलगा 40 टक्के भाजला आहे. या सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT