Pune News
Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: नारायणगावच्या मीना नदी पात्रात फेकल्या 500 मृत कोंबड्या, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Priya More

रोहिदास गाडगे, पुणे

Pune News: पुणे जिल्ह्यातल्या (Pune District) नारायणगावातील (Narayangaon) मीना नदीमध्ये शेकडो मृत कोंबड्या फेकल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात नदीपात्रामध्ये शेकडो कोंबड्या फेकून देण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव-वारुळवाडी हद्दीतल्या मीना नदीपात्रामध्ये (Meena River) मृत कोंबड्या फेकून देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीच्या अंधारात नदीपात्रात जवळपास 500 पेक्षा जास्त मृत कोंबड्या फेकण्यात आल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने याठिकाणी येऊन या मृत कोंबड्या फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

नदीपात्रात मृत कोंबड्या फेकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी भटकी कुत्री आणि पक्षी मृत कोंबड्यांना खात आहेत. अशामध्ये अनेक नागरिक आणि शाळकरी मुले या ठिकानावरून ये-जा करत असतात. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

दोन्ही ग्रामपंचायतींनी या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात सीसीटीव्ही नसल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशातच काही अंतरावर पोलिस स्टेशन, मोठी नागरीवस्ती सुद्धा आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह जाहीर! काय आहे चिन्हाची खासियत?

Malvani liquor Poisoning Case: मालवणी दारुकांड प्रकरणात ४ आरोपी दोषी, १० जणांची निर्दोष मुक्तता; ६ मे रोजी शिक्षेवर सुनावणी

Pm Modi In Satara: मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Kajol Devgan : “…तुझी नाटकं बंद कर”; चाहत्यासोबत उद्धटपणे वागल्यामुळे काजोल झाली ट्रोल, पोस्ट व्हायरल

Today's Marathi News Live : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह 'रोड रोलर'

SCROLL FOR NEXT