Thieves सुरज सावंत
मुंबई/पुणे

हिऱ्यांची मोठी चोरी! म्यानमारच्या व्यापाऱ्याचे 5 कोटींचे हिरे चोरले, टोळीचा पर्दाफाश

म्यानमारच्या हिरे व्यापाऱ्याकडून ५ कोटीचे महागडे हिरे विक्रीसाठी घेऊन त्याला बनावट हिरे देत फसवणुक करणारऱ्या टोळीचा डि.बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: म्यानमारच्या हिरे व्यापाऱ्याकडून ५ कोटीचे महागडे हिरे विक्रीसाठी घेऊन त्याला बनावट हिरे देत फसवणुक करणारऱ्या टोळीचा डि.बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. म्यानमार (Myanmar) मध्ये लष्कराचा हस्तक्षेपाने व्यापाऱ्याचे नुकसान होत असल्याने तो भारतात (India) व्यापार करण्यासाठी प्रयत्न करत असताना व्यापाऱ्याची ओळख सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे.

तक्रारदार यांचा म्यानमारमध्ये पूर्वजांपासून राजेशाही घराण्या्साठी मौल्यवान दागिने बनवण्याचा व्यवसाय आहे. मात्र सध्या म्यानमारमध्ये लष्करी हस्तक्षेप वाढल्याने तेथील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होतं आहे. अशातच भारत विशेषता मुंबई (Mumbai) हे हिरे व्यापाऱ्यासाठी उत्कृष्ठ बाजार पेठ असल्याने व्यापारी वर्षभरापूर्वी भारतात व्यावसाय करण्यासाठी सोशल मिडियावर सर्च करत होते. याच दरम्यान उद्योगपती हा आरोपी उदय चोकसीच्या संपर्कात आला. उदयने व्यापार्याला विविध आमीष दाखवून व्यवसायात चांगला फायदा होईल असे भासवून भारतात बोलवून घेतले.

...त्याला बनावट हिरे देल्याचे लक्षात आले!

भारतात आल्यानंतर व्यापाऱ्याला ५ कोटीचे दोन पुरातन हिरे विक्री करायचे असल्याने ते समोरील पार्टीला दाखवण्याच्या आरोपींनी मागितले. मोठ्या विश्वासाने व्यापाऱ्यानेही ते दिले. मात्र आरोपी उदय चौकसी सुरेशभाई बोराड, खेताराम देवासी, विंकल शहा, प्रवीण उर्फ पप्पु जैन यांनी व्यापाऱ्याला हिरे तपासण्यात गुंतवून हातचलाखीने बनावट हिरे व्यापाऱ्याकडे सोपवले. घरी गेल्यानंतर व्यापाऱ्याने हिरे तपासले असता. त्याला बनावट हिरे देल्याचे लक्षात आले.

हे देखील पहा-

२४ तासात सर्व आरोपींना अटक;

व्यापाऱ्याकडून उदय चोकसी याला फोन केला असता. फोनही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने डीबी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून २४ तासात सर्व आरोपींना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींन पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींवर अशाच प्रकारे आणखी एका गुन्ह्यांची नोंद असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Dharashiv : हातात कोयते, गावठी कट्टे आणि हवेत गोळीबार, तुळजापूर राड्यात भाजपा आमदाराच्या पीएच नाव समोर

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

SCROLL FOR NEXT