दहिसर–मीरा–भाईंदर मेट्रो लाईन ९ वर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा ७० फूट खोल पडून मृत्यू
पोलिस आणि एमएमआरडीएने सुरक्षा प्रोटोकॉल तपास सुरू केला
कंत्राटदार आणि सल्लागार कंपन्यांनी सुरक्षा नियम पाळले नसल्याचे निष्कर्ष
कंत्राटदारांना ५० लाख आणि सल्लागारांना ५ लाख दंड ठोठावला
मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो लाईन ९ बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या ४२ वर्षीय सुपरवायझर बांधकामाची पाहणी करत असताना ७० फूट खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव फरहान तहजीद अहमद असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो लाईन ९ बांधकाम प्रकल्पावर फरहान तहजीद अहमद हे बांधकामावर देखरेख ठेवायच काम करायचे. यादरम्यान ते ७० फूट खोल पडले. अहमद हे मोठ्या उंचीवर काम करताना त्यांचा तोल गेला असावा, ज्यामुळे ते खाली रस्त्यावर पडले असावे असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अहमद यांना ताबडतोब बांधकाम क्षेत्राशेजारी असलेल्या सनराइज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला पोहोचताच मृत घोषित केले. अपघातानंतर, मीरा रोड पोलिसांनी बांधकाम स्थळावरील सुरक्षा व्यवस्थेची पडताळणी सुरू केली.
सध्या, तपास सुरू असताना अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवण्यात आला आहे. अधिकारी जमिनीवरील सुरक्षा प्रोटोकॉल, कामगार पर्यवेक्षण आणि व्यावसायिक सुरक्षा नियमांचे पालन यांचे मूल्यांकन करत आहेत, जे उन्नत मेट्रो पायाभूत सुविधांच्या कामासाठी अनिवार्य आहेत. त्याच वेळी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्वतंत्र चौकशी सुरू केली. प्राथमिक निष्कर्षांमध्ये गजानन कन्स्ट्रक्शन आणि एनए कन्स्ट्रक्शन या दोन कंत्राटदार कंपन्यांनी सुरक्षा पद्धतींमध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले.
सिस्ट्रा इंडिया आणि सीईजी या सामान्य सल्लागार कंपन्यांनी अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन केले नाही हे देखील नोंदवण्यात आले. चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित, एमएमआरडीएने कंत्राटदार संघाला ५० लाख रुपये आणि देखरेखीतील अपयशांसाठी सिस्ट्रा इंडिया-सीईजीला ५ लाख रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.