File photos Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: डिलिव्हरी बॉय ग्राहकांचं पार्सल परस्पर विकायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai Crime News: डिलिव्हरी बॉयचं धक्कादायक कृत्य उघडकीस

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: मुंबईच्या बोरिवली परिसरात फ्लिपकार्ट कंपनीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचं धक्कादायक कृत्य उघडकीस आलं आहे. डिलीव्हरी काम करणाऱ्या तरुणाने ग्राहकांसाठीचे पार्सल परस्पर विकून पैशांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोरिवलीतील एम एच बी कॉलनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील फ्लिपकार्ट कंपनीत काम करणारा डिलीव्हरी बॉय हा ग्राहकांसाठीचे पार्सल परस्पर विकायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याचा प्रकार सुरू होता. या डिलीव्हरी बॉयचं प्रकरण उघडकीस होताच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एम एच बी कॉलनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शैलेश सुहास दिघसकर (40 वय) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो दहिसर रावळपाडा येथील रहिवासी आहे.

मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील फ्लिपकार्ट कंपनीत काम करणाऱ्या डिलीव्हरी बॉयने तब्बल एक लाख 23 हजार 715 रुपये किमतीच्या सामानाची चोरी केल्याची तक्रार एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या तक्रारीनुसार कलम ४०८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्ह्याचे तपास करण्यासाठी झोन अकराचे पोलीस उपायुक्त अजय बन्सल, व. पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी पोलीस उपनिरीक्षक दिपक हिंडे यांना तपासाच्या सूचना केल्या. हिंडे यांनी आरोपींचे मोबाईलचे सीडीआर व इतर तांत्रिक गोष्टीचे विश्लेषण करून , पोलीस उपनिरीक्षक दिपक हिंडे व पोलीस शिपाई घोडके यांनी आरोपीचा शोध घेऊन मीरा रोड परिसरातून एक ऑर्डर डिलिव्हरी करताना ताब्यात घेऊन अटक केली.

मांजराला खाऊ घालण्यावरून तरुणीला मारहाण

मांजराला खाऊ घातल्याच्या कारणावरुन एका तरुणीला शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुणी जखमी झाली असून तिच्या हाताला 32 टाके पडले आहेत. मुंबईतील भुलेश्वर येथे ही घटना घडली आहे.

सिमरीन शुक्ला असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी सिमरीनच्या वतीने पोलिसांत राजकुमार मिश्रा आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर मिश्रांकडून देखील तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

SCROLL FOR NEXT