मुंबईतील दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी ४ फिरते लसीकरण केंद्र
मुंबईतील दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी ४ फिरते लसीकरण केंद्र सुमित सावंत
मुंबई/पुणे

मुंबईतील दुर्लक्षित घटकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी ४ फिरते लसीकरण केंद्र

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोविड – १९ प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असूनही, काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रांपर्यंत येऊ न शकणाऱ्या पर्यायाने दुर्लक्षित राहणाऱ्या समाज घटकांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या हस्ते झेंडा दाखवून या उपक्रमाचा आज (दिनांक ९ ऑगस्ट २०२१) शुभारंभ करण्यात आला आहे. (4 Mobile Vaccination Centers started for Covid Vaccination of Neglected people in Mumbai)

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज या उपक्रमाचा शुभारंभ करताना उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, व्हॅक्सीन ऑन व्हिल्स् चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जिग्नेश पटेल, उपक्रम व्यवस्थापक श्रीमती संगीता मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोविड – १९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत-जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण, गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

या उपक्रमासाठी व्हॅक्सिन ऑन व्हिल्स् आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिके समवेत भागीदारी केली आहे. यामध्ये एचआयव्ही रुग्ण, नाईलाजाने देह विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करुन विनामूल्य लस देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे. त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधीत बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.

या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण ४ फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये १ प्रशिक्षित डॉक्टर, २ परिचारिका, २ वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत. त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे, जेणेकरुन कोविन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.

आज पहिल्या दिवशी महात्मा जोतिराव फुले मंडई परिसरातील पदपथावरील ५० विक्रेते आणि देह विक्रय करणाऱ्या २५ महिलांचे लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी संबंधीत मनुष्यबळाला प्रशिक्षण देखील दिले जात आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये, संबंधीत समाज घटकांच्या परिसरात महानगरपालिकेने नेमून दिलेल्या जागी फिरते लसीकरण केंद्र पोहोचेल. दिनांक १२ ऑगस्ट २०२१ पासून यारितीने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पदपथावरील विक्रेत्यांसाठी बोरिवली भागात पहिले लसीकरण केंद्र तर मालवणी, मालाड, भांडुपमध्ये दुसरे केंद्र कार्यान्वित राहील. देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यासाठी भांडुप-मुलुंडमध्ये तिसरे केंद्र तर ग्रँटरोड आणि कामाठीपुरा भागात चौथे केंद्र कार्यान्वित राहील. अमेरिकन इंडिया फाऊंडेशनसह पदपथ विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना, वाय. आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च ऍण्ड एज्युकेशन यांचादेखील या उपक्रमात सहभाग व योगदान आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT