Malanggad landslide  Saam tv
मुंबई/पुणे

Malanggad landslide : घरात गाढ झोपेत असताना मलंगगडाची दरड कोसळली, लेकाला वाचवताना वडिलांचा मृत्यू

malanggad landslide incident : अंबरनाथमध्ये मलंगगडच्या पायथ्याशी दरड कोसळल्याची घटना घडली. मलंगगड कोसळल्याच्या दुर्देवी घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : कल्याणसह राज्यभरात पावसाची सुरुवात झाली आहे. या जोरदार पावसामुळे मलंगगडाची दरड कोसळल्याची घटना घडली. ही दरड मलंगगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या गुलाम सय्यद यांच्या घरावर कोसळली. सोमवारी सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्देवी घटानेत एकाचा मृत्यू झाला आहे.

अंबरनाथच्या मलंगगडच्या पहिला दर्गा येथे ३५ वर्षीय गुलाम सय्यद हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. गुलाम सय्यद हे त्यांची बायको आणि दीड वर्षांचा मुलासोबत राहत होते. तिन्ही जण घरात झोपलेले असताना मलंगगडाची दरड कोसळली. मलंगगड डोंगराची दरड सोमवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही गुलाम सय्यद यांच्या घरावर कोसळली.

घरावर दरड कोसळल्यानंतर गुलाम यांनी घरातील दीड वर्षाचा मुलाला वाचवले. मात्र, या दुर्देवी घटनेत स्वत:चा जीव गमावला. यामध्ये गुलाम यांची बायको नाभिया या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलंगड डोंगराच्या मागच्या बाजूला काही दिवसांपूर्वी जेएनपीटी-बडोदा महामार्गाच्या टनलचं काम सुरु होतं. टनलचं काम सुरु असताना स्फोट करण्यात आले होते. याममुळे डोंगरामध्ये कंपन झालं होतं. त्यामुळे गुलाम सय्यद यांच्या घरावर दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत गुलाम सय्यद यांचा मृत्यू झाला. गुलाम सय्यद यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT